मी अनुभवलेले सुहास गोविंदराव पुजारी सर
आपल्या 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आमच्या संगमेश्वर कॉलेजमधील कला विभागाचे उपप्राचार्य मराठी विभागप्रमुख डॉ. सुहास गोविंदराव पुजारी आज 28 फेब्रुवारी 2026 ला सेवानिवृत्त होत आहे. त्यानिमित्ताने … पूर्वीच्या उस्मानाबाद आत्ताच्या धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील अचलेर हे सरांचं गाव. सोलापूरच्या सांस्कृतिक वातावरणाशी समरसून गेलेल्या या गावात वडील गोविंदराव यांना पंचक्रोशीत मानाचे स्थान होते. आई सुशीला शाळेत गेल्या नसल्या तरी त्या जीवन अनुभवानी समृद्ध अशा होत्या.पत्रकार , नाट्य अभिनेता , उत्तम क्रीडा संघटक , क्रीडापटू , सत्शील राजकारणी , उत्तम कापड दुकानदार याहीपेक्षा सरांचे वडील एक संवेदनशील भारदस्त व्यक्तिमत्व म्हणून पंचक्रोशीत नावलौकिक मिळवलेले होते. अशा कुटुंबात जडणघडण होताना सरांचे प्राथमिक शिक्षण गावातल्या शाळेत झाले. त्यानंतर विद्या विकास हायस्कूल मधून मॅट्रिक झाल्यानंतरअकरावी बारावी विज्ञान शाखेत शिकण्यासाठी सर सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात दाखल झाले. पुढे पुढील श...