पोस्ट्स

डिसेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नव्या काळाच्या पाऊलखुणा नोंदवण्यासाठी हे संमेलन महत्त्वाचे डॉ.रणधीर शिंदे

इमेज
दयानंदमध्ये सोलापूर जिल्हा साहित्य संमेलनाचा समारोप महाकवी डॉ. द.रा. बेंद्रे साहित्य नगरीतून सोलापूर दिनांक १८  ''एकविसाव्या शतकाची  स्थित्यंतरे ओळखून नव्या काळाच्या पाऊलखुणा नोंदवण्यासाठी हे संमेलन मला महत्त्वाचे वाटते. नव्या लेखक नव्या दमाच्या लेखकांनी या दोन दिवसीय सत्रामध्ये हजेरी लावली आणि आपला लेखन प्रवास मांडला. नव्या काळात आपल्या भोवताली उभारणारे प्रश्न त्या प्रश्नांना कसे सामोरे जावे असे विषय यापुढे आपल्या साहित्यातून येतील असा विश्वास वाटतो.'' असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ रणधीर शिंदे यांनी समारोप सत्रात केले. व्यासपीठावर सोलापूर विद्यापीठाचे प्रो. कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, स्वागताध्यक्ष डॉ.विजयकुमार उबाळे, प्रा.डॉ. श्रीकांत येळेगावकर, प्रिसिजन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुहासिनी शहा, समन्वयक डॉ.राजशेखर शिंदे सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य डॉ. बी. एच. दामजी, प्राचार्य डॉ. एस. बी. क्षीरसागर प्राचार्य डॉ. एस. व्ही. शिंदे, प्राचार्या डॉ. एस. जे. गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. दुसऱ्या दिवसातील क्षणचित्रे ( चौकट )  कथाक...

सोलापूर जिल्हा मराठी साहित्य संमेलन ... महाकवी डॉ. द.रा. बेंद्रे साहित्य दालन, दयानंद कॉलेज आवार, सोलापूर येथे

इमेज
 महाराष्ट्र शासन साहित्य संस्कृती मंडळ मुंबई आणि डी.ए.व्ही. कॉलेज ट्रस्ट व्यवस्थापन समिती नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्हा मराठी साहित्य संमेलन होणार आहे. महाकवी डॉ. द.रा. बेंद्रे साहित्य दालन, दयानंद कॉलेज आवार, सोलापूर येथे दिनांक १७ आणि १८ डिसेंबर २०२५ रोजी. बुधवार दिनांक १७ डिसेंबर २०२५ च्या कार्यक्रमात.... संमेलनास प्रारंभ होईल ग्रंथदिंडीने ....याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या हस्ते होणार आहे.   त्यानंतर लगेचच   संमेलनाचा उद्घाटन समारंभ   होईल. प्रमुख उपस्थिती संमेलनाध्यक्ष - ज्येष्ठ साहित्य समीक्षक प्रा. डॉ. रणधीर शिंदे उद्घाटक निवृत्त सनदी अधिकारी कवी श्रीकांत मोरे विशेष अतिथी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्रकाशजी महानवर, संमेलनाचे कार्याध्यक्ष  माननीय डॉ.महेशजी चोप्रा, स्थानिक, सचिव दयानंद शिक्षण संस्था सोलापूर , स्वागत अध्यक्ष डॉ. विजयकुमार उबाळे, प्रशासक दयानंद शिक्षण संस्था सोलापूर. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा चे सदस्य भरत गावडे आणि विठ्ठ...

बारावी बोर्ड परीक्षेत कृतीपत्रिकेतील लेखन कौशल्य महत्वाचे - राज पवार

इमेज
भाषा संकुलच्यावतीने ' परीक्षेला जाता जाता ' या मालेत व्याख्यान  सोलापूर -( दिनांक ९ ) ''बारावीची बोर्ड परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण पायरी मानली जाते. या परीक्षेत मराठी विषयासाठी नव्या मूल्यांकन पद्धतीनुसार कृतीपत्रिकेचा अवलंब केला गेला आहे. कृतीपत्रिकेतील विविध प्रश्नप्रकार विद्यार्थ्यांच्या ऐकणे, बोलणे, वाचन आणि लेखन अशा समग्र भाषिक कौशल्यांची परीक्षा घेतात. यापैकी *लेखन कौशल्याचा* विभाग अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो, कारण तो विद्यार्थ्यांच्या भाषेतील प्रावीण्य, मांडणी क्षमता आणि विचारसंपन्नता यांचे सम्यक मूल्यमापन करतो. बारावी बोर्ड परीक्षेत कृतीपत्रिकेतील लेखन कौशल्य महत्वाचे आहे. असे मत दयानंद महाविद्यालयाचे कनिष्ठ विभागातील अध्यापक राज पवार यांनी मांडले. भाषा संकुल आयोजित मराठी कृतीपत्रिकेवरील सविस्तर मार्गदर्शनात बोलत होते. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे, प्रा.अशोक निंबर्गी,प्रा.दत्तात्रय गुड्डेवाडी  उपस्थित होते.   पुढे म्हणले की -लेखन कौशल्यामध्ये पत्र, संवाद, मुलाखत, जाहिरात, वृत्तलेखन, रिपोर्ट, ब्लॉग, ई-मेल, सूचना, अप...