पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अभिजात भाषेचा दर्जा

इमेज
 आपल्या मायबोली मराठीसाठीचा ३ ऑक्टोबर २०२४ हा दिवस  खूप महत्वाचा आहे.हाच तो दिवस ज्या दिवशी अनेक साहित्यिक व साहित्यप्रेमींच्या अथक प्रयत्नांनी आपल्या मायबोली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही बाब आपल्या सर्व मराठी भाषिक व मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी एक गौरवाची आणि अभिमानाची घटना आहे. आपण सर्वजण  मराठी भाषिक भाग्यवान आहोत की आपल्या मायबोलीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या ऐतिहासिक क्षणाचे आपण सारे साक्षीदार आहोत.        अभिजात भाषा म्हणजे काय हे सर्वांनाच ठाऊक नसते. परंतु आपल्या भाषेला काही चांगला सन्मान मिळाला आहे हे तरी आपल्याला समजते आणि कळतेही. हा दर्जा मराठी भाषेला सहज मिळालेला नाही. हा दर्जा भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून अभिजात भाषेचे काही निकष पूर्ण केल्यानंतर मिळतो.जसे की भाषेचा भाषेचा प्राचीन इतिहास किमान १५०० ते २००० वर्षे जुना असावा, भाषेची संपन्न व स्वतंत्र साहित्य परंपरा असावी, भाषेचे व्याकरण स्वतंत्र व शास्त्रीय असावे, इतर भाषांवरील प्रभाव तसेच भाषेचे ऐतिहासिक लिखित पुरावे उपलब्ध असावेत असे हे सर्व निकष पूर्ण केल्य...