सुरेश काळे यांना उत्कृष्ट गृहपाल प्राविण्य पुरस्कार प्रदान
गृहपालांच्या कार्यात सेवाभाव,सामाजिक बांधिलकी असते सोलापूर प्रतिनिधी-- '' मागासवर्गीय गुणवंत मुलांच्या शासकीय वसतिगृहामध्ये गृहपाल महत्त्वाची भूमिका पार पाडतात. वसतिगृहात राहणारी मुले पालकांपासून दूर असल्याने गृहपाल त्यांच्यासाठी मार्गदर्शक, पालक आणि शिक्षक बनतात. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणे, शिस्त लावणे, आहार व आरोग्याची काळजी घेणे हे त्यांचे प्रमुख कार्य आहे.गृहपाल मुलांमध्ये वेळेचे भान, स्वच्छतेची सवय, तसेच चांगले संस्कार रुजवतात. ते मुलांना अभ्यासाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतात. त्यामुळे या मुलांचा सर्वांगीण विकास घडतो. गृहपालांचे कार्य केवळ नोकरीपुरते मर्यादित नसून त्यात सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी दडलेली असते. त्यामुळे मागासवर्गीय मुलांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यात गृहपालांचे समर्पित योगदान अनन्यसाधारण आहे.''असे मनोगत उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. निमित्त होते प्राविण्य पुरस्कार प्रदान सोहळ्याचे. महाराष्ट्र शासन,सामाजिक न्याय व ...