डॉ.मारुती शहाणे यांना 'शिक्षणव्रती' पुरस्कार प्रदान.
सोलापूरातील हरिभाई देवकण प्रशालेतील पर्यवेक्षक डॉ.मारुती शहाणे यांना माधवनगर सांगली येथील भ.रा. नाईक व चारुशीला नाईक या दांपत्यांच्या स्मृती प्रत्यर्थ दिला जाणारा हा पुरस्कार त्यांच्या परिवारातील सदस्यांकडून प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम मंगळवार दि.17 जून 2025 रोजी हरिभाई देवकरण प्रशालेतील कै. देव कलानिकेतन येथे पार पडला. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा. दीपा फाटक, संयोजक मा. डॉ. नितीन देशपांडे, सौ. राजलक्ष्मी देशपांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रशालेतील 1975 च्या मॅट्रिक बॅचचे विद्यार्थी, प्रशालेतील पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षिका व मित्रपरिवार उपस्थित होते. शाळा समितीचे अध्यक्ष मा. राजेश पटवर्धन सरांनी शहाणे सरांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन व विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.राजीव मोहोळकर यांनी केले.