आज आकाशवाणी सोलापूर केंद्राचा 39 वा वर्धापन दिन
सोलापूर दिनांक ४ प्रतिनिधी --- आकाशवाणी सोलापूर केंद्राचा ३९ वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. त्या निमित्ताने सकाळी नऊ वाजल्यापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत आकाशवाणीच्या मुख्य इमारतीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त श्रोत्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन आकाशवाणीच्या वतीने प्रसारण अधिकारी, सुजित बनसोडे यांनी केले आहे. वर्धापन दिनाचे औचित्य साधून आज संध्याकाळी ६.३० वाजता रमा कुलकर्णी यांची संगीत मैफिल होणार आहे. यासोबतच रेडिओ फीचर, डॉक्युमेंटरी, नभोनाट्य, काव्यवाचन, अभिवाचन, रेडिओ जिंगल्स, पब्लिक अनाउन्समेंट अशा स्पर्धा कार्यक्रम विभागाच्या वतीने घेण्यात आल्या होत्या. त्याचे बक्षीस वितरण देखील वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात होणार आहे. याप्रसंगी आकाशवाणीचे अधिकारी आणि कर्मचारी वृंद यांची उपस्थिती राहणार आहे भाषा, कला, साहित्य, संगीत यांच्या सोबतच विविध वयोगटांनुसार सोलापूर आकाशवाणीचे कार्यक्रम दिवसेंदिवस लोकाभिमुख होत आहेत. ज्ञानवर्धक कार्यक्रमांमुळे तरुणाई जास्तीत जास्त आकाशवाणी ऐकण्यासाठी उत्सुक आहे. शैक्...