समीर गायकवाड यांच्या 'खूलूस'ला मृत्युंजय साहित्य पुरस्कार !
महाराष्ट्र कामगार संहित्य परिषद पिंपरी चिंचवड यांच्या वतीने दिला जाणारा मृत्युंजय साहित्य पुरस्कार यंदाच्या वर्षी सोलापूरचे लेखक समीर गायकवाड यांच्या खुलूस या कथासंग्रहास जाहिर झाला आहे. गणेश इंटरनॅशनल स्कूल चिखली, पुणे येथे संपन्न होणाऱ्या ३२ व्या राज्यस्तरीय गदिमा कवितामहोत्सवामध्ये सर्व पुरस्कार दिले जातील. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार असून ज्येष्ठ कविवर्य डॉ. विठ्ठल वाघ हे अध्यक्षस्थान भूषवतील; तर एस. बी. पाटील स्वागतप्रमुख आहेत. संगीतकार आनंद माडगूळकर यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस आणि ज्येष्ठ कविवर्य अशोक नायगावकर यांना जीवनगौरव सन्मान प्रदान करून गौरविण्यात येईल. त्याचबरोबर कालिका बापट (गदिमा काव्यसाधना पुरस्कार), संगीता सूर्यवंशी (गदिमा लोककला पुरस्कार), राजन लाखे (गदिमा शब्दप्रतिभा पुरस्कार), अनंत राऊत (गदिमा काव्यप्रतिभा पुरस्कार), समीर गायकवाड ‘खुलूस’ या कथासंग्रहासाठी तर देवा झिंजाड ...