बी.एफ.दमाणी प्रशालेत गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण व सेवा गौरव समारंभ संपन्न
सोलापूर- दिनांक 13 जुलै 2024 माहेश्वरी विद्या प्रसारक मंडळ पुणे संचलित बी.एफ. दमाणी प्रशालेत एस.एस.सी परीक्षा मार्च-2024 मध्ये विशेष प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा व सेवानिवृत्त सेवकांचा सेवागौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला समारंभाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट मा. डॉ. श्री. आशिषजी भुतडा उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली. प्रशालेतील प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेले सेवक श्री. महादेव पवार यांचा सेवानिवृत्तीनिमित्त संस्थेतर्फे व प्रशालेतर्फे सत्कार करण्यात आला. समारंभाचे प्रमुख पाहुणे, दमाणी विद्यामंदिराचे माजी विद्यार्थी मा.डॉ.श्री. आशिषजी भुतडा यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमता,आवड यांचा विचार करून भविष्यकालीन वाटचाल करताना जिद्द,कष्ट, ध्येयनिष्ठा,सकारात्मक दृष्टिकोन,प्रयत्नातील सातत्य, सचोटी,प्रामाणिकपणा व विनयशीलता अंगीकारून यशस्वी होऊन शाळेचा नावलौकिक वाढविण्याचे आवाहन केले. संस...