पोस्ट्स

जून, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

'मनसमझावन' समकालीन आणि वेधक कादंबरी प्रा.डॉ.रणधीर शिंदे

इमेज
  संग्राम गायकवाड यांच्या कादंबरीवर परिसंवाद   सोलापूर ( दिनांक ६   ) '' सनदी अधिकारी संग्राम गायकवाड यांची मनसमझावन ही कादंबरी   समकालीन आणि वेधक आहे. तत्कालीन सामाजिक क्षेत्रांचा धांडोळा घेत वैचारिक , भावनिक , सामाजिक , धार्मिक मनोविश्लेषणात्मकतेसोबत लालित्यपूर्ण आणि उत्कंठावर्धक झाली आहे. नव्याने लिहिणाऱ्यांनी ही कादंबरी नक्कीच वाचावी कारण यामध्ये अनेक सामाजिक संदर्भ आपल्याला सापडत जातात त्यावरील भाषा ही महत्त्वाचे आहे. '' असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठातील प्रा.डॉ.रणधीर शिंदे यांनी केले. ते संग्राम गायकवाड यांच्या ' मनसमझावन ' या कादंबरीवर आयोजित परिसंवादात बोलत होते.   याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.महेंद्र कदम , कादंबरीकर प्रवीण दशरथ बांदेकर , लेखक संग्राम गायकवाड , कॉम्रेड रवींद्र मोकाशी   मंचावर उपस्थित होते.   प्रारंभी प्रगतिशील लेखक संघाच्या सोलापूर जिल्हा शाखेने हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश आपल्या प्रास्ताविकात डॉ.दत्ता घोलप यांनी सांगितला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे सत्कार झाले. याच कार्यक्रमात अमेरिकेत होणाऱ्या गांधी-...