दहावी बोर्ड परीक्षेत दमाणी प्रशालेची 100% निकालाची परंपरा कायम
सारंग पवार 98.80% टक्के गुणांसह प्रशालेतून प्रथम मार्च -2024 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी.बोर्ड परीक्षेत बी.एफ. दमाणी प्रशालेच्या विदयार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत 100% निकालाची उज्वल यशाची परंपरा कायम राखली. एकूण 119 पैकी 98 विदयार्थी विशेष योग्यता तर 17 विदयार्थी प्रथम श्रेणीत व 4 विदयार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. प्रशालेच्या 51 विदयार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले तर 9 विदयाथ्यांना संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले. प्रशालेतील प्रथम 3 विदयार्थी पुढीलप्रमाणे प्रथम - चि. पवार सारंग संतोष 98.80% व्दितीय - चि. जाधव तन्मथ बाळासाहेब 98.60% व्दितीय - चि. खोत अथर्व राजेंद्र 98.60% तृतीय- चि. पाटील श्लोक शिवानंद 97.40% तृतीय - कु. तोडकर श्रेया लक्ष्माण 97.40% माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, पुणेचे उपाध्यक्ष मा. श्री. गिरीधारीजी भुतडा, संस्थेचे स्थानिय अध्यक्ष मा.श्री. नंदकिशोरजी भराडिया, सचिव मा.श्री. कालीदासजी जाजू सहसचिव मां.श्री. उज्वलजी तापडिया व संस्थेचे मान्यवर पदाधिकारी...