माध्यमिक विद्यार्थ्यांची अध्ययन संपादणूक वाढविणे आवश्यक -- शशिकांत शिंदे
संगमेश्वर कॉलेजमध्ये 'शिक्षक क्षमता वृद्धी ' प्रशिक्षण सुरू सोलापूर प्रतिनिधी - ''ज्ञान आणि कौशल्ये शिक्षकांना आत्मसात व्हावीत आणि त्यांनी विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करावे यासाठी शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळेतील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील इयत्ता नववी ते बारावीच्या शिक्षकांना 'शिक्षक क्षमता वृद्धी' प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS), कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक (PGI) यांचा विचार करता असे लक्षात येते की, माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची अध्ययन संपादणूक वाढविणे आवश्यक आहे.'' असे प्रतिपादन अधिव्याख्याता शशिकांत शिंदे यांनी केले. राज्य शैक्षणिक संशोधन व परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्याकडून आयोजित केलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाच्या सत्रात बोलत होते. व्यासपीठावर प्रा.डॉ.प्रभाकर बुधाराम उपस्थित होते. दरम्यान डायटचे प्राचार्य जितेंद्र साळुंखे, संगमेश्वर कॉलेज कनिष्...