पोस्ट्स

जानेवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कांचन प्रकाश संगीत यांच्या वनमहर्षींच्या सहवासात या पुस्तकाचे प्रकाशन

इमेज
   रानावनातल्या माणसाच्या दिव्यत्वाच्या प्रचितीतून दर्शन..     प्रा. डॉ. सुहास पुजारी  सोलापूर प्रतिनिधी "रानावनातला माणूस म्हणून समर्पित जीवन जगताना त्यांच्यातल्या दिव्यत्वाची प्रचिती आल्याने कांचन प्रकाश संगीत यांचा लेखणीतून वनमहर्षींच्या सहवासात हा ग्रंथ आकारास आला आहे. एक प्रामाणिक वनाधिकारी किती वैविध्यपूर्ण, संवेदनशीलतेने साहित्य सेवा करू शकतो याचे दुसरे उदाहरण साहित्य विश्वात शोधून सापडणार नाही. मारुती चितमपल्लींचा अनेक लोकांशी संपर्क आलाय त्यांनी वनाला जनात आणून दाखवण्याची किमया केली आहे." असे प्रतिपादन जेष्ठ साहित्य समीक्षक उपप्राचार्य प्रा. डॉ. सुहास पुजारी यांनी केले.ते पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्था रानवेध आणि वाइल्ड लाईफ कंजर्वेशन असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. 'वनमहर्षींच्या सहवासात' हे कांचन प्रकाश संगीत (निवृत्त सहाय्य निर्देशक, आकाशवाणी मुंबई ) यांच्या-पुस्तकाचे प्रकाशन काल लोकमान्य टिळक सभागृह हि. ने. वाचनालय पार्क चौक येथे झाले. याप्रसंगी वनमहर्षी  मारुती चितमपल्ली, उपवनसंरक्षक सोला...