पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भौतिक शास्त्रामधील करिअर

इमेज
भौतिकशास्त्राबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात विनाकारण एक प्रकारचे दडपण किंवा अनामिक भिती असते. सर्वप्रथम ही भीती घालवण्यासाठी थोडेसे लेखन करतो. शाळेपासून मनात एक न्यूनगंड असतो तो हाच की , “ फिजिक्स खूप खूप अवघड आहे ”, कुणीतरी मनामध्ये पेरलेला. खरे तर जिवनाची सुरुवात ही पहिल्या श्वासापासून   होते तिथे फुप्फुसांचे आंकुचन व प्रसरण हे प्राणवायूच्या उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वहन यामुळे होते हे समजण्यासाठी भौतिकशास्त्राची आवड निर्माण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या दिवसाची सुरुवात पक्ष्यांच्या किलबिलाटापासून होते. त्यांचे वेगवेगळे ध्वनी व त्या ध्वनीचा अभ्यास भौतिकशास्त्र करते. सूर्यकिरणांचा अभ्यास , प्रकाशाचा अभ्यास , सूर्याचा अभ्यास , सूर्य मालेचा अभ्यास , ग्रह , तारे , धूमकेतू , उल्का , विश्वाचा अभ्यास , हे विश्व कसे निर्माण झाले ? याचा अभ्यास , का निर्माण झाले ? याच्या अभ्यासाचा प्रयत्न इ. अनेक कल्पनातीत गोष्टी या भौतिकशास्त्रामध्ये प्रत्यक्षात अभ्यासता येतात. हवा दिसत नाही पण जाणवते. हवेचा दाब मोजण्यासाठी भौतिकशास्त्रातील समिकरणे व उपकरणेच काम करतात .   त्याचप्रकारे ध्व...

रेडीओची एक सुरम्य आठवण.....

इमेज
  रेडीओची एक सुरम्य आठवण.....     हे सगळं आपण अनुभवलंय....   ते परत एकदा जागवा...   आकाशवाणीचे हे मुंबई केंद्र आहे...   नमस्कार श्रोतेहो…!   मध्यम लहरी   "तीनशेअठ्ठ्यात्तर अंश सात आठ मीटर्स अर्थात सातशेब्याण्णव किलोहर्ट्झ" वर आकाशवाणीचे हे   केंद्र आहे…किंवा “२३९.८१ मीटर म्हणजेच १२९१ किलोहर्ट्ज“ वर आकशवाणीच्या केंद्रा वरून आम्ही बोलत आहोत…   " सकाळचे पाच वाजून पन्नास मिनिटे व दहा सेकंद झाली आहेत आहेत… "असा निवेदिकेचा मंजूळ स्वर कानी पडायचा आणि सनईचे सूर वाजायचे.   कधी सांगली , कधी पुणे , तर कधी मुंबई केंद्र एवढाच काय तो फरक.   बाकी कार्यक्रम सगळीकडे तितकेच सुरेल आणि सुंदर … हे सगळं काय ?..... तर एकेकाळचा “रेडिओ” आणि “आमचं जीवन”....   आज पुन्हा आठवलं नव्यानं.   किती रम्य दिवस होते ते आणि अविस्मरणीय आठवणी..!! आठवण एवढ्याच साठी म्हटलं कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचं एक वेगळ स्थान होतं   कारण त्या   “रेडिओच्या” जमान्यात   आपण लहानाचे मोठे झालो आणि हा...