स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्रा.यशपाल खेडकर यांना पीएच.डी.
स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्रा.यशपाल खेडकर यांना पीएच.डी. पंढरपूर- स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रा. यशपाल मारुतीराव खेडकर यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून ‘अॅनालिसीस अँड टेस्टिंग ऑफ मॉडीफाईड हायड्रोलिक सेमीअॅक्टीव्ह डेम्पर बाय मॅग्नेटोरहॅलॉजिकल अप्रोच’ या विषयात बेंगलोर मधील जैन विद्यापीठामधून पीएच.डी. प्रदान करण्यात आली. पीएच.डी. प्राप्त केल्यामुळे महाविद्यालयात त्यांचा सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी मा. शमा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या प्रेरणेने व डॉ.सुनील भट यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. खेडकर यांनी पीएच.डी. पूर्ण केली. त्यांना आई सौ.मंदाकिनी खेडकर, वडील मारुतीराव खेडकर, भावंडे व पत्नी यांच्यासह स्वेरीच्या इतर प्राध्यापकांचेही सहकार्य लाभल्याचे डॉ.खेडकर यांनी सांगितले. डॉ.खेडकर हे बालपणापासून आजतागायत एक प्रतिभावंत वक्ते म्हणून सर्वज्ञात आहेत. स्वेरीतील प्रत्येक कार्यक्रमाचे उत्तम नियोजन आणि शब्दांची उत्तम मांडणी करून अभ्यासपू...