संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या ध्वनीचित्रफितीची संहिता
संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या ध्वनीचित्रफितीची संहिता स्वातंत्र्यपूर्व कालखंडात सोलापूर शहरात उच्च शिक्षणाची वानवा होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोलापूर शहरात राहण्याची देखील सोय नव्हती. या गरजेतून सामान्य कष्टकऱ्यांची मुले शिकावीत या हेतून काडादी परिवारानं त्यावेळी सात रस्ता परिसरातील आत्ताच्या दगडी इमारतीत ८ नोव्हेंबर १९३२ वीरशैव वस्तीगृहाची सुरुवात केली. यातून शेकडो कष्टकऱ्यांची मुलं सोलापुरात शिकू लागली. पुढे स्वातंत्र्यानंतर कर्मयोगी कैलासवासी आप्पासाहेब काडादी आणि त्यांचे बंधू कै. नागपण्णा काडादी यांचं धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात आपलं काम सुरू होतं. सोलापुरात सात रस्ता परिसरात एक कॉलेज असावं अशी अनेकांची इच्छा त्याकाळी होती. काडादी बंधुद्वयांनी ही गोष्ट हेरली पुढे कर्मयोगी कै.अप्पासाहेबांनी केएलइ सोसायटीच्या माध्यमातून संगमेश्वर कॉलेजची १९५३ साली मुहूर्तमेढ रोवली.१९५८ साली श्री श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून बंधुद्वयांच्या कुशल मार्गदर्शनाखाली स्वतंत्र कॉल...