पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कवी शिवाजी शिंदे यांच्या 'कैवार' या काव्यसंग्रहातील वास्तववादी जीवनदर्शन

इमेज
  म नुष्याच्या जडणघडणीत   त्याला आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब त्याच्या लेखनातून उमटते .डॉ.शिवाजी शिंदे यांची जडणघडण ते ज्या प्रांतातून आले तेथील सामाजिक स्थित्यंतरे ' कैवार ' या काव्यसंग्रहात भेटतात.कवितांमधील कोलाहाल वाचकाला विचार करायला लावतो.सहज सोप्या भाषेतील कविता चटकन उमजतात. मुळात शिक्षण शास्त्रातून त्यांना मिळालेली मूल्ये अनेक ठिकाणी दिसतात. व्यवस्थापन कौशल्याने सांभाळताना त्यांच्या ठायी असलेला भाषेचा लळा त्यांना अधिकच समृद्ध करत गेला आणि ते लिहिते झाले. समाजशास्त्राचं नेमकं भान ठेवत ऐतिहासिक परंपरांची गुंफण ' कैवार ' मधील कवितेत येते.ते शेतकरी पुत्र असल्याने शेतशिवारातलं जगणं त्यांना माहित आहे. अवर्षण , महापूर , चक्रीवादळ , अवकाळी पाऊस , गारपीट   यासह दुष्काळाने होणारी शेतकरी कुटुंबाची होरपळ अस्वस्थ करते. शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेली व्यथा त्यांच्या ' हुलकावणी ' कवितेतून शब्दबद्ध होते. माझा शेतकरी राजा वाट पाहतो रे तुझी डोळा पाणी आणूनी   नको देऊ रे तू पावसा हुलकावणी... पावसाच्या भरोशावर काढलेले कर्ज , पावसाची हुलकावणी आणि पोरांच्या भविष्याची ...