पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कन्नड मनावर राज्य करणारा मराठी मातीतला 'वरकवी'- डॉ. द. रा. बेंद्रे. ----प्रा. अशोक निंबर्गी.

इमेज
  कन्नड मनावर राज्य करणारा मराठी मातीतला ' वरकवी '- डॉ. द. रा. बेंद्रे. पातरगित्ती पक्का , नोडिदेन अक्का , हसरू हच्ची चुच्ची   मेलक अरशिण हच्ची... ' या कन्नड काव्याच्या ओळी सहज ऐकताना माझ्या शालेय जीवनातील एक कविता आठवली , ' रंग रंगुल्या सान   सानुल्या गवत फुला रे गवत फुला , असा कसा रे मला लागला सांग तुझा रे , तुझा लळा.... ' या गाण्याचा आठवणीने बालपण हिंदकळून गेलं. या कन्नड काव्याचे कवी कोण असावेत ? असा प्रश्न मनाशी पडला. कन्नड शिकवणाऱ्या माझ्या एका मित्राला मी सहजच विचारलं या सुंदर कवितेचे कवी कोण आहेत ? त्या मित्राने मोठ्या अभिमानाने सांगितलं की या काव्याचे कवी ' कर्नाटकचे वरकवी ' म्हणून ज्यांना ओळखले जाते ते पद्मश्री डॉक्टर दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे...... डॉ. बेंद्रे यांचे नाव ऐकताच अनेक स्मृती जाग्या झाल्या. मला आठवलं ते अजरामर कन्नड भावगीत ' नी हिंग नोडब्याड नन्ना , तिरीगी ना ह्यांग नोडले निंना.... ' कन्नड जानपद विश्वामध्ये डॉ. बेंद्रे रचित आणि सि. अश्वत्थ यांनी गायलेलं या जानपदातील आर्तता जरी काव्याचा अर्थ कळला नसला तरी माझ्यासारख्या ...