अनलॉकनंतर कोविड सोबत वावरताना
अनलॉकनंतर कोविड सोबत वावरताना वेळ दुपारची. 1 वाजण्याच्या दम्यानची. मी श्रीरंग पीएनबी बँकेतून काम आटोपून कॉलेजकडे मार्गस्थ होणार होतो. बाळीवेस, जुन्या शाळेचा परिसर आला की कोण जाणे शाळे समोरुन जावे असे वाटते.दरम्यान पीएनबी बँकेत जाजी टीचर त्यांच्या सरांसोबत भेटल्या. खुशाली विचारली मात्र हळव्या सुरातच ... एक तर मिलिंद सरांचं अकाली जाणे , त्यानंतर दोन टीचरांच्या यजमानांचे जाणे दोन्ही घटना मन सुन्न करणाऱ्या., पण ती सविस्तर बोलण्याची जागा नव्हे म्हणून मी पटकन तोडलं अन माझं काम एका वाक्यात अधिकाऱ्याला विचारून खाली निघालो. शाळेसमोरून जाताना मुलांच्या किलबिलाटाचा नुसताच भास झाला. कायम गर्दीने भरलेला परिसर सुना सुना वाटत होता.