आवडीच्या खेळात खेळाडू नैपुण्य मिळतोच
आवडीच्या खेळात खेळाडू नैपुण्य मिळतोच जिम्नॅस्टिकचे पंच, प्रशिक्षक हर्षद कुलकर्णी सोलापूर (प्रतिनिधी) " खेळ कोणताही असो आपल्याला ज्या खेळात आवड आहे त्यासंबंधी आपलं आकलन आपल्या लक्षात घेतलं की तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. खेळाडू आवडीच्या खेळात उतरला की तो नक्कीच नैपुण्य मिळवतो." असे मत जिम्नॅस्टिकचे आंतरराष्ट्रीय पंच, प्रशिक्षक हर्षद रवींद्र कुलकर्णी यांनी मांडले. ते संगमेश्वर कॉलेज(स्वायत्त) सोलापूर येथील जिमखाना विभागाच्या वतीने आयोजित ऑनलाईन संवाद कार्यक्रमात बोलत होते. कॉलेजच्या यूट्युब वाहिनीवरून हा कार्यक्रम थेट प्रसारित करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.शोभा राजमान्य होत्या तर जिमखाना विभाग प्रमुख प्राध्यापक आनंद चव्हाण यांनी या कार्यक्रमाचं समन्वय केलं. प्रारंभी संस्थेच्यावतीने प्रा. आनंद चव्हाण यांनी प्रास्ताविक करून कॉलेजची क्रीडा परंपरा सांगत पाहुण्यांची ओळख करून दिली आणि स्वागत केले. त्यानंतर प्रा.संतोष पवार यांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांचा प्रवास उलगडला. या संवादात हर्षद कुलकर्णी यांनी खेळ आणि मानसिकता या...