पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
  लॉकडाऊन डायरी - ‘ आपल्या टीचर ’   वेळ सकाळची. 23 एप्रिल 2021 ची.   माझं दीक्षित ( जेवण ) आटोपून मी वर्तमानपत्र चाळत होतो. मुलांचं ऑनलाईन सुरू होतं. श्रीरंग चौथीत असल्याने त्याच्या टीचरांनी   वार्षिक परीक्षेचा पेपर कसा सोडवायचा ?   यावर मार्गदर्शन सुरू केलं होतं. दरम्यान काही जणांकडे नेट पोहोचत नसल्याने टीचर तुमचा आवाज येत नाही ...तुम्ही दिसतच नाही... असे अनेक छान संवाद ऐकायला खूप छान वाटत होते.ऑनलाईन का असेना आपण वर्गात असल्याचं फील हा प्रसंग आणून देत होता , कारण की सगळ्या मुलांचे माईक ऑन   हो ते .    प्रत्येक जण ‘ आपल्या टीचर ’ या नात्याने आपलं म्हणणं जोरजोरात रेटत   होता. एवढ्या टीचर   म्हणाल्या ... "मुलांनो येतो आवाज माझा " ?   " हो   टीचर , नाही   टीचर " असे आवाज घुमायला लागले. पुन्हा एकदा जणू   आपण त्या शाळेच्या घरट्यात गेलो आहोत असं जाणवायला लागलं.   रेडिओ या माध्यमात काम करत असल्याने त्या मुलांच्या कौटुंबिक बोलीभाषेचा लहेजा मला त्यांच्या संवादातून खूप छान जाणवत होता. मुलं खूप छान संवादी झाली. ...