आज 12 जानेवारी डायरीचा संकल्प केला. निमित्त होतं संध्याकाळी शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या मंदिरात दीपोत्सवाच्या निमित्ताने जाण्याचे. सासरेबुवा पांडुरंग माने सध्या आळंदीत राहतात माऊलींच्या सावलीत. यांच्यासोबत सारंग , श्रीरंगला घेऊन देवळात जाणं झालं. तिथे योगायोगाने आमचे दैवत माननीय धर्मराज काडादी साहेब भेटले. सहकुटुंब आलात काय? अशी चौकशी त्यांनीच केली आणि शिवयोगिंच्या मुख्य गाभाऱ्यातून आम्हाला दर्शन सिद्धरामांच घडवलं. *मी धन्य झालो*. पार्श्वभूमी अशी की त्या पूर्वी दोन दिवस अगोदर श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेत लेसर शो च्या माध्यमातून सिद्धेश्वरांचे चरित्र जनतेला दाखवण्याच्या कामात कथा सांगण्यासाठी माझा आवाज लोकांपर्यंत पोचणार होता. त्याची जबाबदारी साहेबांनी पाटील सर अन माझ्यावर सोपवलेली. त्यात संत ज्ञानेश्वरांचे आजी-आजोबा पंढरपूरला जाताना इथे मुक्कामाला होते. अशी कथा आहे तीच गोष्ट माझ्या मनात रुंजी घालायली लागली. माझे सासरे इमानेइतबारे आळंदीला सध्या सेवा करत आहे.आज 12 जानेवारीला त्यांच्या हस्ते श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांची आरती...